Sunday, October 4, 2009

श्री गणेश !!!!

आज मी माझ्या मराठी Blog चा श्री गणेश करीत आहे !! आता तुम्ही प्रश्न विचाराल, अजून एक Blog कशाला ? आणि हा प्रश्न अगदी १०० टक्के विचारण्या जोगा आहे. आधीच माझे दोन Blogs आहेत. ते ही मी अधून-मधूनच update करतो. एक तर लिहायला विषय मिळत नाहीत, आणि जर मिळाला तर त्या क्षणी लिहायला साधन किंवा वेळ नसतो. त्या मुळे सध्या साधारण एका महिन्यात एक किवा फार तर दोन लेख (फार मोठा शब्द झाला हा, पण आत्ता मला दुसरा शब्द आठवत नाही :-) एवढीच माझी मजल जाते. मग तिसरा Blog कशाला ?

आता ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर ते एवढेच की गेले काही महिन्यात माझ्या आणि मराठी भाषे मध्ल्ये अंतर नाहीसे झाले आहे. ह्याची सुरवात झाली झी टीव्ही च्या 'सा रे ग म' ह्या कार्यक्रमाने. जस जशा मी त्या शो चा आनंद लुटत गेलो तस तसा माझे माझ्या मातृभाशे बद्दल चे प्रेम वाढत गेले. ह्या चा अर्थ हा नाही की आधी प्रेम नव्हते. परंतु ते पुन्हा जागरूक झाले असे म्हणा. हेच पुढे चालवण्या साठी हा माझा नवीन उपक्रम. बर्याच विविध विषयांवर लेख लिहायचा माझा प्रयत्न राहील.

वाचकांनी कृपया दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

१. इंग्रेजी ते मराठी हे रुपांतर मी Google Indic Translation ह्या website द्वारे करीत आहे. म्हणून ते सारखेच बरोबर असेल असे नाही.

२. शेवटी मराठी ही माझी मातृभाषा असली तरी माझे शिक्षण इंग्रेजी माध्यमात ले. त्यामुळे माझे मराठी लिहिण्याच्या स्तराबद्दल कोण ला काही गैरसमज नसावेत. भाषा अगदी साधी असेल आणि कधी कधी शब्द वापरात चुका असतील. त्या मुळे क्षमस्व.

तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी माझ्या पहिल्या 'लेखाचे' समापन करतो.

धन्यवाद
अमित

2 comments:

  1. tujhya navin upakramaa baddal tulaa khup-khup shubhecchaa :)
    ~ketan

    ReplyDelete
  2. Hmmm, so after MNS, ShivSena - BJP, Congress - NCP, looks like you have also joined the marathi bandwagon.
    All the best

    Suresh Bhatanchya shabdat sangyache tar:
    Lagle amhas baghya bolte marathi
    Jhalo karech dhanya aikto marathi
    Dharma Panth Jaat manato marathi
    Yewdya jagat maay manato Marathi

    Dhananjay

    ReplyDelete