Monday, October 19, 2009

२२ तारखेला काय होणार ?

तर शेवटी एकदाचे मतदान पार पडले आणि सर्व उमेदवारांचे नशीब इलेक्ट्रोनिक वोटिंग माचीन मध्ये कैद झाले !! सगळे सध्या दिवाळीचा आनंद लुटत असतील परंतु त्या मधील बहुतेक जणांचे लक्ष्य असेल २२ तारखेकडे. त्या दिवशी काय होणार ? कोणाचे नशीब फुलेल ? हे प्रश्न नुसते उमेदवारांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेला पडले आहेत. आणि मुख्य म्हणजे, ह्या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल काय सांगेल ?

एकंदर Exit Polls च्या म्हण्या अनुसार गेलो तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस या युतीला बहुमत (२८८ पैकी १४५ जागा) मिळेल असे दिसते. ह्याचा अर्थ ही युती मंत्रालयावर सत्ते ची hat-trick करेल असे दिसते. गेल्या १० वर्षात त्यांच्या सरकारने काही नेत्रदीपक कामगिरी केली असे काही नाही. पण तरीही त्यांनी पुन्हा एकदा सत्ते वर येणे हे खरे कौतुकास्पद मानले पाहिजे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातले विपक्ष त्यांना कडवी झुंज देतील असे वाटत नाही. आणि त्याचे कारण म्हणजे विपक्षात पडलेली फूट. राज ठाकरेच्या वाढत्या लोकप्रियते मुळे मराठी मतात पुन्हा एकदा (लोक सभेच्या निवडणुकीप्रमाणे) फूट पडेल असे दिसते. आणि खरेतर याच फुटीमुळे कॉंग्रेस - राष्ट्रवादी यांना सत्ता मिळेल, स्वतःच्या कामगिरी वर नाही. परंतु ह्या फुटाचा दोष एकट्या राज ठाकरे याला देणे हे मला मान्य नाही. गेल्या - वर्षात शिव सेनेची महाराष्ट्रावरची पकड ढिली होताना दिसत आहे. आणि ह्याचाच फायदा राज ठाकरे आणि . . से. नी घेतला. आणि जस जशी निवडणूक जवळ आली, तस तशे आपल्या ला सर्व वाहिन्यांवर सर्वात जास्त वेळा दिसला तो राज ठाकरे. ह्याचा परिणाम असा कि ..से. ला लगेच 'Dark Horse' आणि राज ला 'king maker' ह्या पदव्या मिळाल्या . म्हणजे राज ची संमती असेलेलेच सरकार सत्ते वर येईल. अर्थात, २२ तारखे ला महाराष्ट्राच्या जनते पुढे सगळे काही साफ होईल.

शेवटी एक गोष्ट, माझ्या मते, तर खरी. ती ही कि, जर कॉंग्रेस - राष्ट्रवादी नी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले तर ते खूप lucky ठरतील. आणि मुंबई महाराष्ट्र मधील मराठी माणसांना पुन्हा एकदा एक जूट होऊन 'आपले सरकार' सत्ते वर आणण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील.

Sunday, October 4, 2009

श्री गणेश !!!!

आज मी माझ्या मराठी Blog चा श्री गणेश करीत आहे !! आता तुम्ही प्रश्न विचाराल, अजून एक Blog कशाला ? आणि हा प्रश्न अगदी १०० टक्के विचारण्या जोगा आहे. आधीच माझे दोन Blogs आहेत. ते ही मी अधून-मधूनच update करतो. एक तर लिहायला विषय मिळत नाहीत, आणि जर मिळाला तर त्या क्षणी लिहायला साधन किंवा वेळ नसतो. त्या मुळे सध्या साधारण एका महिन्यात एक किवा फार तर दोन लेख (फार मोठा शब्द झाला हा, पण आत्ता मला दुसरा शब्द आठवत नाही :-) एवढीच माझी मजल जाते. मग तिसरा Blog कशाला ?

आता ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर ते एवढेच की गेले काही महिन्यात माझ्या आणि मराठी भाषे मध्ल्ये अंतर नाहीसे झाले आहे. ह्याची सुरवात झाली झी टीव्ही च्या 'सा रे ग म' ह्या कार्यक्रमाने. जस जशा मी त्या शो चा आनंद लुटत गेलो तस तसा माझे माझ्या मातृभाशे बद्दल चे प्रेम वाढत गेले. ह्या चा अर्थ हा नाही की आधी प्रेम नव्हते. परंतु ते पुन्हा जागरूक झाले असे म्हणा. हेच पुढे चालवण्या साठी हा माझा नवीन उपक्रम. बर्याच विविध विषयांवर लेख लिहायचा माझा प्रयत्न राहील.

वाचकांनी कृपया दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

१. इंग्रेजी ते मराठी हे रुपांतर मी Google Indic Translation ह्या website द्वारे करीत आहे. म्हणून ते सारखेच बरोबर असेल असे नाही.

२. शेवटी मराठी ही माझी मातृभाषा असली तरी माझे शिक्षण इंग्रेजी माध्यमात ले. त्यामुळे माझे मराठी लिहिण्याच्या स्तराबद्दल कोण ला काही गैरसमज नसावेत. भाषा अगदी साधी असेल आणि कधी कधी शब्द वापरात चुका असतील. त्या मुळे क्षमस्व.

तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी माझ्या पहिल्या 'लेखाचे' समापन करतो.

धन्यवाद
अमित